पत्रकारितेतील निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण वृत्तांकनाची दखल घेत ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्ये

पत्रकारितेतील निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण वृत्तांकनाची दखल घेत ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांची प्रतिष्ठेच्या ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 12 जुलै रोजी मुंबई येथे ’आर्यारवी एंटरटेनमेंट’ यांच्या वतीने आयोजित पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य व समाजसेवक पुरस्कार सोहळा-2026 मध्ये त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
किशोरकुमार वागदरीकर यांनी पत्रकारितेत नेहमीच निर्भीड, निष्पक्ष आणि जनहिताला प्राधान्य देणारे वृत्तांकन केले आहे. सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना डिजिटल माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वागदरीकर यांनी आपल्या पत्रकारिता कारकिर्दीत दै.सकाळ, दै.भास्कर, दै. देशोन्नती आणि दै. लोकमंच क्रांती या वृत्तपत्रांमध्ये विविध जबाबदार्या सांभाळल्या आहेत. सध्या ते ’टाईम्स न्यूज 24’ या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनहिताच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. यापूर्वीही पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा सन्मान होत असून, नांदेड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

COMMENTS