Homeताज्या बातम्या

संगमनेरमध्ये उद्या पुस्तक जत्रा 

अकोले : कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्य, कला व सांस्कृतिक संघ, संगमनेर यांच्या वतीने रविवारी (१२ जुलै) पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात दिवसभर विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी दिली.पुस्तक जत्रेचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सुधीर तांबे उपस्थित राहतील. यावेळी संजय मालपाणी, बाबासाहेब सौदागर, पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास दुर्गाताई तांबे, मैथली तांबे, संजय कळमकर, तुकाराम धांडे, शशीकांत शिंदे, सोमनाथ कळसकर, सुनील गोसावी, संदीप वाकचौरे, बाळासाहेब कोठुळे, बाळासाहेब वाघ, शब्बीर शेख, संतोष खेडलेकर, सोमनाथ मुटकुळे, गायत्री रामटेके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पुस्तक जत्रेपूर्वी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर ‘नवोदित साहित्यिक आणि त्यांच्यापुढील आव्हाने’ या विषयावर हिरालाल पगडाल, तर ‘साहित्याने समाजाला काय दिले?’ या विषयावर संदीप वाकचौरे संवाद साधणार आहेत.दुपारच्या सत्रात संजय कळमकर यांचे कथाविषयक व्याख्यान होणार असून, गायत्री रामटेके एकपात्री अभिनय सादर करणार आहेत. सायंकाळी चार वाजता कविसंमेलन होणार आहे. या संमेलनाच्या विविध सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे शशीकांत शिंदे, तुकाराम धांडे, सुनील गोसावी आणि बाळासाहेब कोठुळे भूषविणार आहेत.पुस्तक जत्रा सर्वांसाठी खुली असून, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव राजाभाऊ भांडगे, कार्याध्यक्ष विवेक वाकचौरे, कोषाध्यक्ष नितीन कोळपकर तसेच संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

जल जीवनच्या प्रलंबित कामांकडे आ.काळेंनी वेधले सरकारचे लक्ष
रेल्वेखाली झेप घेत तरुणाची आत्महत्या
सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या
The Ultimate Book Lover's Bucket List: Must-attend literary events – Once Upon a Book Club

COMMENTS