श्रीगोंदा : डोंबिवली येथे डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त करत महाराष

श्रीगोंदा : डोंबिवली येथे डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त करत महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीचे निवेदन श्रीगोंदा पोलिस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी हे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा अत्यावश्यक घटक असून ते दिवस-रात्र रुग्णसेवेसाठी कार्यरत असतात. उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय गुंतागुंती किंवा प्रतिकूल परिणामांमुळे कायदा हातात घेऊन डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. अशा हिंसक घटनांमुळे केवळ डॉक्टरांचे मनोबल खच्ची होत नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन सर्वसामान्य रुग्णांच्या हितालाही बाधा पोहोचते.श्रीगोंदा शहर व परिसरातील सर्व शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात सेवा देता यावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही असोसिएशनने वतीने करण्यात आली आहे.निवेदनात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियमाची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करावी.डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी किंवा रुग्णालयांवर हल्ला करणाऱ्या तसेच धमक्या देणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहनराव लबडे यांनी सांगितले की, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्ण यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. समाजाला अखंड, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वैद्यकीय क्षेत्र पार पाडत असून, त्यासाठी सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही प्रशासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी डॉ.राजेश पाखरे, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ.बबन चव्हाण, डॉ.विक्रम कसरे, डॉ. राजेंद्र सिदनकर, डॉ. संतोष मोटे,डॉ. रविराज मचे, डॉ. सौ चैताली मखरे, डॉ.मखरे डॉ. अनिल कोकाटे,डॉ. पांडुरंग दातीर,डॉ. संजय टकले,डॉ. निलेश पाटील,डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. अनिल शिंदे यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS