Homeताज्या बातम्या

आंध्रप्रदेशात कोविडमुळे एकाचा मृत्यू

कडप्पा : आंध्रप्रदेशातील कडप्पा येथे कोविड संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीवर सलग चार दिवस प्रत

नातेवाईकांवर कारवाई, पण तंबाखू खाऊन ड्युटी करणार्‍या कर्मचार्‍यावर मेहरबानी का?
पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 
कामकाजात गती, स्वच्छतेत शिस्त; महापौरांचे क्षेत्रीय कार्यालयांना कडक निर्देश
Fact Check : भारतात पुन्हा कोरोनाने दोघांचा मृत्यू? सत्य काय? महत्वाची माहिती समोर - Marathi News | Andhra pradesh covid update two person dies due to corona and newly 4 cases found


कडप्पा : आंध्रप्रदेशातील कडप्पा येथे कोविड संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीवर सलग चार दिवस प्रतिजैविक औषधांच्या साहाय्याने उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आणि अखेरीस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. रवी बाबू यांनी या घटनेची माहिती दिली.
डॉ. रवी बाबू यांनी सांगितले की, मृत व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन होते. श्‍वास घेण्यास तीव्र त्रास होणे, सतत खोकला येणे अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत दोन्ही फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर त्याला फुफ्फुसांचा संसर्गही झाल्याचे आढळले. प्राथमिक उपचारांमध्ये प्रतिजैविक औषधे देण्यात आली; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील तपासणी करण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या विशेष तपासणीत कोविड संसर्गाची पुष्टी झाली. उपचारांचे सर्व प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. या घटनेनंतर कडप्पा आणि तिरुपती जिल्ह्यांत आणखी पाच जणांना कोविड संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सर्व शासकीय रुग्णालयांकडून विलगीकरण कक्षांची उपलब्धता, अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या, प्राणवायूचा साठा, कृत्रिम श्‍वसनयंत्रांची उपलब्धता, आवश्यक औषधे, तातडीच्या तपासणी संचांचा साठा, रुग्णवाहिका सेवा तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची उपलब्धता याबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS