नाशिक : नाशिक येथे धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आरोपी असलेल्या माजी टीसीएस कर्मचारी निदा खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने न
नाशिक : नाशिक येथे धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आरोपी असलेल्या माजी टीसीएस कर्मचारी निदा खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने नमूद केले की, निदा पाच महिन्यांची गर्भवती असून तुरुंगात बाळाला जन्म देण्याचा मानसिक आघात कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो. न्यायालयाने तुरुंगात झालेल्या भगवान कृष्णाच्या जन्माचाही दाखला दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी सांगितले की, नवजात बाळाचे भविष्य आणि आईची स्थिती लक्षात घेता आरोपीला जामीन देणे योग्य आहे. न्यायालयाने हे देखील मान्य केले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे आरोपीला तुरुंगात ठेवण्याची गरज नाही.

COMMENTS