Homeताज्या बातम्या

सा.बां.मध्ये विशिष्ट लॉबीचा मुख्यमंत्री आणि सरकारच्या बदनामीचे षडयंत्र !एमएसआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडी आणि सा.बां.मध्ये कामांची रस्सीखेच

मुंबई : राज्याच्या राजकारणात ज्याप्रकारे फोडाझोडीचे राजकारण सुरू आहे, त्याचप्रकारचा खेळ सार्वजनिक बांधकाम विभागात एका विशिष्ट लॉबीकडून सुरू आहे.

एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी सुधीर डागा
वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ
MahaPWD (@mahapwdofficial) / Posts / X


मुंबई : राज्याच्या राजकारणात ज्याप्रकारे फोडाझोडीचे राजकारण सुरू आहे, त्याचप्रकारचा खेळ सार्वजनिक बांधकाम विभागात एका विशिष्ट लॉबीकडून सुरू आहे. एका विशिष्ट लॉबीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात असून, त्यातून आपला आर्थिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या टोळीकडून सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआयडीसी), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी) आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणांवर रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदात्त हेतू ठेऊन राज्यात पायाभूत सोयी-सुविधांचे मोठ्या प्रमाणावर जाळे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अखत्यारित विविध विकास कामांना प्राधान्य दिले आहे. मात्र एकीकडे जातद्वेष आणि दुसरीकडे बदनामीचे षडयंत्र वापरून मुख्यमंत्री महोदयांना बदनाम करत सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांची पळवापळवी जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे एसएसआयडीसीला पळवणे, तर दुसरीकडे एमएसआरडीसीची कामे एमएमआरडीला पळवण्याचा उद्योग सुरू आहे. यामध्ये कामांची मंजुरी एक अधिकारी आणतो, तर दुसर्‍या विभागातील अधिकारी हेच कामे पळवतांना दिसून येत आहे. यातील मोठी गोम म्हणजे जो अधिकारी कामांची मंजुरी आणतो तो त्यासाठी पाहिजे तितकाच निधी आणतो, मात्र दुसरा अधिकारी याच कामांसाठी निधी वाढवून घेत मोठ्या प्रमाणावर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराला वाव देतांना दिसून येत आहे. यामागे एक लॉबी मोठ्या प्रमाणावर काम करतांना दिसून येत आहे. त्या लॉबीचा उद्देश विशिष्ठ जातसमूहांना एकत्र आणून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न यातून होतांना दिसून येत आहे. या लॉबीने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचीच बदनामी करण्याचे एक सुनियोजित कट-कारस्थान रसचल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भातील माहिती दैनिक लोकमंथनच्या हाती आली असून, या अधिकार्‍यांना हाताशी धरून हा जो खेळ सुरू आहे, त्यातून केवळ मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि काही विशिष्ठ अधिकार्‍यांची आणि प्रामुख्याने सरकारची बदनामी करण्याचा डाव यातून आखण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच ही विकासकामांची रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री आपल्यासोबत असल्याचे सांगून सुनियोजित पद्धतीने भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारातून अपहार करायचा हेच सूत्र या लॉबीचे असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS