कोरपगाव : महावितरणचे सर्कल कार्यालय कोपरगाव मतदार संघापासून अहिल्यानगर येथे जवळपास ११० किलोमीटर दूर अंतरावर असल्यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध्ये प्रचंड दिरंगाई होत आहे. अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला गती मिळावी व उत्तरेच्या तालुक्यातील वीज ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय कोपरगाव किंवा शिर्डी या ठिकाणी सुरु करावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी विधीमंडळात सरकारकडे करून उर्जा विभागाच्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील जनतेला भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांबाबत विधानसभेत जोरदार आवाज उठवला. महावितरणचे स्वतंत्र सर्कल कार्यालय कोपरगाव किंवा शिर्डीला सुरु करणे, शहरातील भूमिगत वीजवाहिन्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, वीज ग्राहकांचा स्मार्ट मीटर बसविण्यास होत असलेला विरोध यांसह वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांकडे आमदार आशुतोष काळे यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. सौर उर्जा प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे जेणेकरून शेतकऱ्यांची जीवघेण्या रात्रीच्या त्रासातून मुक्तता होईल. तसेच स्मार्ट मीटर बाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर दुप्पट तिप्पट दाखवला जावून वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्मार्ट मीटरचा पेड रक्कम संपल्यानंतर वीज पुरवठा आपोआप खंडीत होत आहे. विश्वासात न घेता महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून शासनाने या बाबीची दखल घेऊन स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी किंवा जनतेमध्ये जनजागृती करावी अशी मागणी केली.

COMMENTS