Homeताज्या बातम्या

मंदिर उभारणीस आज शुभारंभ; रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू होणार

 येथील प्राचीन श्री जोड मारुती मंदिराच्या भव्य नव्या मंदिर उभारणीच्या कार्याला गुरुवार, दि. 9 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. सकाळी 8.3

हरिदास महाराज सोळंके यांच्या निवासस्थानी भक्तिमय भजन संध्या संपन्न
साधुसंतांच्या आशीर्वादाने नव्या जबाबदारीची सुरुवात : आ. कोल्हे
येरवडा कारागृहात भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळाकीर्तनातून बंद्यांना दिला सदाचाराचा संदेश



 येथील प्राचीन श्री जोड मारुती मंदिराच्या भव्य नव्या मंदिर उभारणीच्या कार्याला गुरुवार, दि. 9 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. सकाळी 8.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सोहळ्यात रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू करण्यात येणार आहे.
मंदिराच्या पायाभरणीनंतर आता उभारणीच्या मुख्य टप्प्याला सुरुवात होत असून हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. श्रीराम व मारुतीरायांच्या जयघोषात विधिवत पूजन करून मंदिर उभारणीच्या कार्याचा शुभारंभ केला जाणार आहे. श्री जोड मारुती मंदिर हे कुंडलवाडी व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. नव्या मंदिरामुळे धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेला अधिक बळ मिळणार असून भाविकांसाठी अधिक सुसज्ज व भव्य मंदिर उपलब्ध होणार आहे. या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्यास कुंडलवाडी शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदिर उभारणीच्या पुण्यकार्याचे साक्षीदार व्हावे, तसेच आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS