Homeताज्या बातम्या

बांधकाम कामगार देशाच्या विकासाचा कणा : औताडे 

कोपरगाव शहर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील वंचित घटकांना न्याय देण्याची जबाबदारी शिवसेना पदाधिकारी घेत असतात. शिवसेना पक्षाच्या बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना पोहोचवण्याचे काम होत असते. बांधकाम कामगारांच्या समस्या जवळून पाहिल्या असल्याने ते या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी शिवसेना पक्ष आहे. आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सुविधा मिळून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगत बांधकाम कामगार देशाच्या विकासाचा कणा असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले. यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाट, प्रतिभाताई, शिंदेताई, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, शिवाजी जाधव, किरण गवळी, किशोर चोरगे, विशाल जाधव, मच्छिंद्र शार्दुल, विलास जाधव, इम्रान शेख, बाबासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.यावेळी बांधकाम कामगारांना सुरक्षा किटमध्ये हेल्मेट, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी शूज, हातमोजे मास, मच्छरदाणी टॉर्च अदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार जिल्हाप्रमुख विशाल शिरसाट यांनी सांगितले की, सर्व क्षेत्रातील बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केली पाहिजे. खरा कामगार बाजूला राहतो इतरांची नोंदणी होते ही बाब चांगली नसून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून दरवर्षी आपण हयात असेपर्यंत नोंदणी ॲक्टिव्ह केली पाहिजे. आभार अक्षय जाधव यांनी मानले.

सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे नियमांत मोठे बदल;  तालुका कृषी अधिकारी भोरे यांची माहिती
निघोजमधील रक्तदान शिबिरात २०७ रक्तदात्यांचा सहभाग  
जायनावाडी येथे शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप  

COMMENTS