Homeताज्या बातम्या

अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत फेरोज खान यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

राज्यसभेचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थ

निवडणूक आली की आमदार हेमंत पाटील व आमदार चिखलीकर विसंवादी सुर का लावतात?महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचा, इतर निवडणुकात मात्र विरोध का?
अशोकराव चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचे नाव चर्चेत; ‘निष्ठावंतांना’ पुन्हा डावलणार?
राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल



राज्यसभेचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रभाग क्रमांक 8, शिवाजीनगर येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रतिनिधी फेरोज खान यांनी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी फेरोज खान यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे शिवाजीनगर परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याचा विश्वास उपस्थित पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजप महानगर सरचिटणीस विजय येवनकर, माजी नगरसेवक संदीपभाऊ सोनकांबळे, मंडळ अध्यक्ष अमित वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS