सोनई : आषाढी वारीनिमित्त सोनई (ता. नेवासा) येथील वारकऱ्यांच्या दिंडीचे सोमवारी (दि.७) महादेव मंदिर परिसरातून उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात दिंडी मार्गस्थ झाल्याने परिसर भक्तिमय झाला होता.दिंडीत सहभागी झालेल्या पुरुष वारकऱ्यांच्या हातात टाळ असून ते अभंग व हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करत होते. महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारीची परंपरा जपली. पांडुरंगाच्या प्रतिमेने सजविलेला रथही दिंडीसोबत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. रथाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.दिंडीच्या प्रस्थानावेळी ग्रामस्थ, भाविक आणि विठ्ठल भक्तांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाचे दर्शन घडवत दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.दिंडी चालक सुधाकर गडाख यांनी सांगितले की, या वर्षीही मोठ्या संख्येने वारकरी दिंडीत सहभागी झाले असून नियोजनबद्ध पद्धतीने वारी सुरू झाली आहे. दिंडीचा पहिला मुक्काम शनिशिंगणापूर येथे होणार असून त्यानंतर नियोजित टप्प्यांनुसार दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

COMMENTS