निघोज : माजी सरपंच तथा माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कपिलेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिरात तब्बल २०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा विक्रम नोंदविला.विळद घाट येथील विखे पाटील रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिरासाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे शिबिराचा प्रारंभ सकाळी दहा वाजता झाला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदात्यांची नोंदणी सुरू होती. दिवसभर रक्तदानासाठी युवकांच्या रांगा लागल्या होत्या.रक्तदान शिबिराचा प्रारंभ मेजर कमलाकर बेलोटे आणि पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर उपस्थितांनी संदीप पाटील वराळ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात; मात्र निघोज येथे रक्तदात्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि संदीप पाटील वराळ यांच्याविषयी नागरिकांमध्ये असलेला स्नेहभाव विशेष लक्षवेधी ठरला.शिबिरात सहभागी प्रत्येक रक्तदात्याचा रेनकोट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. अळकुटी, रांधे, वडनेर, शिरापूर, पाबळ तसेच परिसरातील अनेक गावांतील युवकांनी रक्तदानात सहभाग नोंदविला.कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील, सचिन पाटील वराळ, सुनील पवार, चित्रा वराळ पाटील, ज्ञानेश्वर वरखडे, ठकाराम गायखे, साजिद तांबोळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ तसेच पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS