Homeताज्या बातम्या

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशवसंतराव काळे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम

बीड : वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यास

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सौ. के.एस.के. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
तुलसी शैक्षणिक समूहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


बीड : वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. याप्रसंगी वसंतराव काळे कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. आर. डी. सय्यद, संभाजी राजे कॉलेज, बीडच्या प्रभारी प्राचार्या सौ. कोमल सुरवसे, प्रशासकीय अधिकारी श्री. बी. एस. हावळे, सहाय्यक प्राध्यापक श्री. एस. जे. गाढवे, कार्यालयीन कर्मचारी श्री. डी. डी. जाधव, श्री. शंकर इंगोले, सौ. संध्या खोसे, तसेच बीड प्रसारचे पत्रकार श्री. इमरान इनामदार व श्री. सचिन चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज असून, वृक्षसंवर्धनाशिवाय शाश्वत विकास शक्य नसल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी वृक्षांची निगा राखण्याची व परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले असून, उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, एक विद्यार्थी – एक वृक्ष हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी महाविद्यालय सातत्याने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS