Homeताज्या बातम्या

डिजिटल प्रशासनाकडे नांदेड महापालिकेची दमदार झेपआता घरबसल्या मिळणार ऑनलाईन गुंठेवारी प्रमाणपत्र; नागरिकांची धावपळ संपणार

नांदेड : नागरिकांना जलद, पारदर्शक आणि त्रासमुक्त सेवा देण्याच्या उद्देशाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला डिजि

प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी शासनासाठी उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री फडणवीस; इक्विनिक्स एमबी 3 डेटा सेंटरचे उद्घाटन
विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!
जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल; करचोरी रोखण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) वापरणारे देशातील पहिले राज्य ठरले!


नांदेड : नागरिकांना जलद, पारदर्शक आणि त्रासमुक्त सेवा देण्याच्या उद्देशाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला डिजिटल स्वरूप देत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्या वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नसून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून प्रशासनातील पारदर्शकतेलाही मोठी चालना मिळणार आहे.
या डिजिटल सुविधेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन गुंठेवारी प्रमाणपत्रांचे वितरण महापौर  कविता मुळे व पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी – पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, गटनेते संदिपसिंघ गाडीवाले, साबेर चाऊस, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त अभिजीत वायकोस, उपअभियंता खुशाल कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात हनुमंत बोदरवाड, गणेश कटकम, दिपक कांबळे, गजानन चक्रवार, संजीवकुमार तळवणे आणि रामदास वावधाने यांना पहिली डिजिटल गुंठेवारी प्रमाणपत्रे देण्यात आली. नव्या प्रणालीमुळे नोंदणीकृत आर्किटेक्ट किंवा अभियंत्यामार्फत अर्ज सादर करणे, कागदपत्रांची छाननी, विकास शुल्क भरणे, अर्जाची स्थिती पाहणे आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र डाउनलोड करणे ही संपूर्ण प्रक्रिया आता घरबसल्या करता येणार आहे. यामुळे कामकाजाला वेग मिळण्याबरोबरच गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे.
ऑनलाईन गुंठेवारीचे नागरिकांना 5 मोठे फायदे
* महापालिकेच्या फेर्‍यांपासून कायमची मुक्तता.
* घरबसल्या अर्ज, शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा.
* डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र सर्व शासकीय कामांसाठी वैध.
* अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन पाहण्याची सोय.
* पारदर्शक, जलद आणि भ्रष्टाचारमुक्त प्रक्रिया.
महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
महापौर कविता मुळे यांनी नागरिकांना कोणत्याही मध्यस्थांच्या अमिषाला बळी न पडता थेट ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पात्र नागरिकांनी विहित मुदतीत अर्ज दाखल करावेत, असे सांगत भविष्यात गुंठेवारी सेवा आरटीएस आणि सेतू सुविधा केंद्रांमार्फत उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपायुक्त अभिजीत वायकोस यांनी मानले.

COMMENTS