Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया; अनधिकृत वापरावर कारवाईची मागणी

कुंडलवाडी शहरात सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक नळांना तुटी नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या

अवाजवी घरपट्टी विरोधात कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे धरणे    
वार्षिक मालमत्ता कर आकारणी कमी करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन
वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारावाआ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी



कुंडलवाडी शहरात सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक नळांना तुटी नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात,व नळ मालकांना तुटी लावण्याचे सक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये नळांना तुटी बसविण्यात याव्यात, जेणेकरून पाण्याचा अपव्यय थांबेल व सर्व नागरिकांना नियोजनबद्ध पाणीपुरवठा करता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः उन्हाळ्यात व पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरात काही ठिकाणी शासनाच्या बोरवेलमधून अनधिकृतरीत्या पाणी वापर होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही व्यक्तींना मोफत बोर कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, काही ठिकाणी नवीन घरांच्या बांधकामासाठी शासनाच्या बोरवेलचे पाणी वापरण्यात आल्याचीही चर्चा आहे. तसेच काही जण रात्रीच्या वेळी चोरून पाणी भरत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून अनधिकृत पाणी वापर, पाण्याचा काळाबाजार व महसुलाचे नुकसान थांबविण्यासाठी संबंधितांवर कर आकारणीसह नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी पाणी ही सार्वजनिक संपत्ती असल्याची जाणीव ठेवून त्याचा काटकसरीने वापर करावा तसेच प्रशासनानेही पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS