Homeव्हिडीओ

पोलिसानेच केली चोरी! , व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस निलंबित.

https://youtu.be/RoSm6diwGzI उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ट्रक ड्रायव्हरने थ

नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ट्रक ड्रायव्हरने थेट पोलीस अधिकाऱ्यावरच चक्क २० हजार रुपयांची चोरी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस दारोगा गिरीश मिश्रा यांनी या ट्रक चालकाकडून लिफ्ट घेतली होती. टोल प्लाझाजवळ अधिकारी गाडीतून उतरून निघून गेले, पण त्यानंतर जेव्हा ड्रायव्हरने ट्रकच्या कॅबिनमध्ये पाहिले, तेव्हा त्याचे २० हजार रुपये गायब होते. पोलिस अधिकाऱ्यावर संशय आल्याने या हिंमतवान ड्रायव्हरने तब्बल १३ किलोमीटरपर्यंत पोलिसाचा पाठलाग केला आणि अखेर त्यांना पकडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा त्यांची झडती घेण्यात आली, तेव्हा पोलीस वर्दीतूनच चोरी केलेले पैसे जप्त करण्यात आले. या संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत हमीरपूर पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. पण जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच असे कृत्य घडल्याने, आता पोलीस प्रशासनातील अनियमिततेवर आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

COMMENTS