Homeताज्या बातम्या

भाजपच्या इङ–2 यांनी डखठ मोहीम यशस्वी करावी; इङज यांना सहकार्य करा – भागवत देवसरकर

निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (डखठ) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी ता

अनधिकृत पाणी उपसा करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्‍यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांचे निधन
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
निवडणूक आचारसंहिता; काय करावे, काय करु नये ? नांदेड दि. 11 नोव्हेंबर:- मा. राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व 1 ...



निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (डखठ) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपच्या इङ–2 यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांच्या घरी भेटी देण्याचे आवाहन केले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, चैतन्य बापू देशमुख, मराठवाडा समन्वयक नितीन काळे, नांदेड उत्तर जिल्हा प्रभारी किरण पाटील आणि जिल्हाध्यक्ष ड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत देवसरकर म्हणाले की, अचूक मतदार यादी हा सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद व्हावी आणि अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत राहू नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यांनी इङ–2, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन इङज यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. नव्याने 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवती, नाव कमी झालेले मतदार, पत्ता बदललेले नागरिक तसेच मृत व्यक्तींची माहिती वेळेत देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सध्या डखठ मोहिमेअंतर्गत हदगाव तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर भाजपचे इङ–2 कार्यकर्ते इङज यांच्या समवेत घरभेटी घेऊन मतदारांची माहिती पडताळून पाहत आहेत. नागरिकांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, जन्म दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहनही भागवत देवसरकर यांनी केले. या मोहिमेमुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त होऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS