Homeताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी विधिमंडळात आमदार आनंद बोंढारकर आक्रमक’महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा अधिनियम 2025’ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी

नांदेड : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्न

नायगाव तालुक्यात पावसाची हजेरी; वादळी वार्‍याने बळेगावात झाडे कोसळली, विजेचा खांब पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट
प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण
वनविभागाचा गलथान कारभार; पैसा आडवा, माती जिरवा


नांदेड : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधत ’महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा अधिनियम 2025’ ची प्रभावी अंमलबजावणी तातडीने करण्याची जोरदार मागणी केली. औचित्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राज्यातील, विशेषतः मराठवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना कायद्याने मंजूर झालेल्या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
सभागृहात बोलताना आमदार आनंदराव बोंढारकर म्हणाले की, राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी अधिनियम मंजूर केला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी वारंवार निवेदने देऊन तसेच बैठका घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदींचा उल्लेख करताना त्यांनी 65 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7 हजार रुपये मानधन, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मोफत आरोग्य सेवा, महाराष्ट्र दर्शनासाठी दरवर्षी 15 हजार रुपयांचे आर्थिक अनुदान, तसेच निराधार वृद्धांसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था आणि तक्रार निवारणासाठी स्वतंत्र टोल-फ्री हेल्पलाइन तातडीने सुरू करण्याची मागणी केली. आज अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे कायद्याच्या तरतुदी केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असे आमदार  बोंढारकर यांनी स्पष्ट केले. तालिका अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांनी सरकारला नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना अधिनियमातील सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याचे आणि या कायद्याची राज्यभर प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

COMMENTS