सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील लावण्या कला वर्गाच्या वतीने आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत रांजणगाव येथील उद्योजक अरुण भालेकर यांचा मुलगा

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील लावण्या कला वर्गाच्या वतीने आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत रांजणगाव येथील उद्योजक अरुण भालेकर यांचा मुलगा शिवराज भालेकर याने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत पारनेर तालुक्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यामध्ये शिवराज भालेकर याने उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक मिळविले.लावण्या कला वर्गाच्या संस्थापिका सायली कळसकर यांच्या हस्ते शिवराज भालेकर याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास सुपा परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS