Homeताज्या बातम्या

ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची घसरण

नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताच्या क्रमवारीत पुन्हा घसरण झाली असून देश 125व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील काही वर्षांत

युद्धविराम आणि संभाव्य परिणाम!
अमेरिका-इराण चर्चेला पुन्हा खीळ; अधिकार्‍यांनी पाकिस्तान दौरा केला रद्द
इराण तात्काळ सोडून भारतात परत या !युद्धविरामनंतर मायदेशी परतण्याचे आवाहन
भारताची पासपोर्ट रँकिंगमध्ये घसरण, पहिल्या 100 देशांमधून बाहेर; पहिल्या 10 मध्ये कोणते देश? Global Passport Index 2026: India's passport ranking drops, falls out of top 100 ...


नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताच्या क्रमवारीत पुन्हा घसरण झाली असून देश 125व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील काही वर्षांत किंचित सुधारणा दिसून आली असली, तरी भारताला अद्याप पहिल्या शंभर देशांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
उपलब्ध आकडेवारीनुसार, 2021 ते 2023 या कालावधीत भारत 127 व्या क्रमांकावर होता. त्यानंतर 2025 मध्ये दोन स्थानांची सुधारणा होत भारत 124 व्या क्रमांकावर पोहोचला; मात्र यंदा पुन्हा एक स्थान घसरून 125 व्या क्रमांकावर नोंद झाली आहे. सध्या भारतीय पासपोर्टधारकांना केवळ 26 देशांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय किंवा आगमनानंतर प्रवास परवानगी मिळण्याच्या सुविधेसह प्रवेश करता येतो. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय नागरिकांच्या प्रवास सुलभतेवर मर्यादा असल्याचे या क्रमवारीतून स्पष्ट झाले आहे. या निर्देशांकात भारताची स्थिती नामिबियापेक्षाही खालची असून फिलिपिन्स, मोरोक्को आणि उझबेकिस्तानसारख्या देशांनी भारतापेक्षा सरस स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, अझरबैजान आणि किर्गिस्तानपेक्षा भारताची स्थिती तुलनेने अधिक चांगली असल्याचे दिसून येते. भारतीय नागरिकांना भूतान, नेपाळ, जमैका, मकाओ, पॅलेस्टाईन, ट्युनिशिया, अंगोला आणि बार्बाडोस यांसारख्या देशांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय अथवा आगमनानंतर परवानगी मिळण्याच्या सुविधेचा लाभ घेता येतो. मात्र, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन आणि संयुक्त अरब अमिरातींसह सुमारे 88 देशांमध्ये प्रवेशासाठी भारतीय नागरिकांना पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. भारताच्या शेजारील देशांचा विचार केल्यास चीन 104व्या क्रमांकावर असून तो भारताच्या पुढे आहे. तथापि, दक्षिण आशियातील अनेक देशांच्या तुलनेत भारताचे स्थान अधिक मजबूत आहे. बांगलादेश 166व्या, नेपाळ 164व्या, तर पाकिस्तान 188व्या क्रमांकावर असून तो या निर्देशांकातील तळाच्या देशांमध्ये गणला जातो.

COMMENTS