Homeव्हिडीओ

राहुरीजवळ ५० विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटून १५ जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.

https://youtu.be/ok_oFiC3tx4 अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. राहुरी येथील कोंढवड गा

कोपरगावचे महिला समुपदेशन केंद्र बंद होण्याच्या मार्गावरडॉ. गावित्रे ; महिलांच्या समस्या सोडविणाऱ्या केंद्रास अद्याप पर्यायी जागा नाही
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. राहुरी येथील कोंढवड गावाजवळ ५० शाळकरी मुलांनी भरलेली एक स्कूल बस अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला उलटली आहे. या भीषण अपघातानंतर घटनास्थळावर एकच खळबळबळ उडाली आणि मुलांचा मोठा आरडा ओरड ऐकायला मिळाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी बसलेले होते, ज्यापैकी १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या मुलांना कशाबशा प्रकारे बाहेर काढण्यात आले असून सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, मिळालेल्या माहितीनुसार एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, ज्यामध्ये बस रस्त्याच्या कडेला पूर्णपणे उलटलेली दिसत आहे. हा अपघात नेमका कसा झाला, बस चालकाचे नियंत्रण सुटले की काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे सर्व पालकांमध्ये अत्यंत चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS