कडा -पैठण बारामती राज्य महामार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना साडेचारच्य
कडा -पैठण बारामती राज्य महामार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना साडेचारच्या दरम्यान कड्याजवळील सासू सुनेच्या माळानजीक घडली.प्रभाकर भिवा सोनाळे वय वर्ष 45 रा.
माणिदौंडी ता.पाथर्डी हा मृत झाला असून मच्छिंद्र नवनाथ आंधळे रा.लिंबोडी हे गंभीर जखमी झाले आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील सोनाळवाडी चे प्रभाकर भिवा सोनाळे वय वर्ष 45 हे एम.एच 13,8137 कड्यावरून कांद्याची पट्टी घेऊन गावाकडे जात असताना पैठण बारामती रोडवरील सासू सुनाच्या माळाजवळून लिंबोडीकडे दुचाकी क्रमांक एम.एच 23,ए.एच.662 जात असताना समोरासमोर झालेल्या अपघातात प्रभाकर सोनाळे याचा जागीच मृत्यू झाला तर मच्छिंद्र नवनाथा आंधळे रा.लिंबोडी हे गंभीर जखमी झाले असून त्याना पुढील उपचारार्थ अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. कडा बाजार समितीत आले होते लिलावासाठी कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांदा लिलाव होतो.याठिकाणी कांदा घेऊन ते आले होते.आणि सायंकाळच्या दरम्यान घराकडे निघाले असता ही दुर्दैवी घटना घडली.शेतकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS