अंबाजोगाई : संगीत क्षेत्रातील महागुरू, बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक तथा सामाजिक कार्यकर्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी डॉक्टर्स डे व कृष

अंबाजोगाई : संगीत क्षेत्रातील महागुरू, बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक तथा सामाजिक कार्यकर्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी डॉक्टर्स डे व कृषी दिनाचे औचित्य साधत अमृत महोत्सवी 75 वे रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
गेल्या तब्बल 25 वर्षांपासून ते नियमितपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे. त्यांच्या या अमृत महोत्सवी रक्तदानामुळे युवकांनीही रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात सहभागी व्हावे, असा प्रेरणादायी संदेश दिला गेला. यावेळी माजी नगराध्यक्ष महादुजी मस्के, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, डॉ. विनय नाळपे, गोविंद शेठ तापडिया, शशिकांत नाना गायकवाड, अजय राठोड, अतुल कसबे, शैलेश स्वामी यांच्यासह वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश बोरगावकर यांच्या अमृत महोत्सवी रक्तदानाबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा आधारस्तंभ श्री नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी), नगरसेवक संजय भैय्या गंभीरे, ड. कैलास चामणर आणि स. का. पटेकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे रक्तदानाविषयी समाजात जनजागृती होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

COMMENTS