Homeताज्या बातम्या

बीड येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात ; 32 दात्यांनी केले रक्तदानरोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त  विद्यमाने उपक्रम

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एक स्तुत्य उपक्रम राबविण

माजंलगाव सिव्हिल हॉस्पिटलची धक्कादायक वास्तवता उघडउपचाराऐवजी रेफरचा खेळ? गरीब रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण
पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ
बीड जिल्हा क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनच्या सीएमई कार्यक्रमास जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद



सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 1 जुलै 2026 रोजी रोटरी वर्षाच्या सुरुवातीचे आणि राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर भागातील जीवनज्योत हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले असून, यात 32 दात्यांनी रक्तदान केले.
सध्याच्या काळात रक्ताची वाढती गरज आणि रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी परिवारातील सर्व सदस्य, त्यांचे कुटुंबीय, तरुण वर्ग आणि मित्रपरिवाराने अत्यंत उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभाग घेतला. सकाळी शिबिराची सुरुवात झाल्यानंतर अत्यंत कमी वेळेत तब्बल 32 सुजाण रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून मानवसेवेचा एक मोठा संदेश याप्रसंगी देण्यात आला. रक्तदात्यांमध्ये महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरीच्या दोन्ही क्लबच्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांनी सुरुवातीपासूनच विशेष नियोजन केले होते. शिबिराच्या ठिकाणी येणार्‍या प्रत्येक रक्तदात्याचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. रक्ताचे महत्त्व आणि जीवन वाचवण्यातील त्याचे योगदान यावर उपस्थितांनी प्रकाश टाकला. दोन्ही क्लबच्या सदस्यांनी उत्तम समन्वय ठेवून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष श्रीगोपाल लड्डा (सीए) आणि सचिव सुहास बेदरे यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या सदस्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली. यामध्ये वाय. जनार्दन राव, अभयजी कोटेचा, मुकुंद कदम, रत्नाकर क्षीरसागर, राम मोटवानी, संतोष पवार, विवेक बडगे, डॉ. मनोज पोहनेरकर, विकास उमापूरकर, संदीप खोड, डॉ. मेघराज पिंगळे(असिस्टंट गव्हर्नर), संकेत कदम, गणेश मुळे, अक्षय शेटे, ज्ञानेश्वर वारे, अशोक राऊत, अभय पटवारी, कचरू चांभारे, प्रमोद करमाळकर, सुमित जयस्वाल, डॉ. रमेश घोडके, विशाल क्षीरसागर, जीवन डोळस आणि अशोक देशमुख यांनी उपस्थित राहून शिबिराच्या विविध कामांत सक्रिय सहभाग घेतला व रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश सेठी आणि सचिव मनोज थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिडटाउन क्लबच्या सदस्यांनी देखील या उपक्रमात खांद्याला खांदा लावून काम केले. यावेळी राहुल बोरा, नितीन गोपन ( असिस्टंट गव्हर्नर), निलेश जगदाळे, सुरेंद्र बजाज, दिनेश लोळगे, सुरेश बुद्धदेव, संजय गुप्ता, प्रकाश मंत्री, सर्वज्ञ जोशी, बद्रीनारायण मानधने, प्रविण ढगे, फारुख सय्यद, रमेश चव्हाण, प्रदीप शेटे, गणेश वाघ, राजेश थोबडे, अमोल तळेकर, किरण सावसे आणि जितेंद्र बोरा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबिराच्या व्यवस्थापनात आणि यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका व्यक्तीचे रक्त दुसर्‍या व्यक्तीचे प्राण वाचवू शकते, ही भावना या शिबिराच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जीवनज्योत हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलनाचे काम अत्यंत सुरक्षित व शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. शिबिराच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रोटरी क्लबच्या या यशस्वी आणि लोकोपयोगी उपक्रमाचे बीड शहरातील नागरिकांकडून आणि वैद्यकीय क्षेत्राकडून भरभरून कौतुक केले जात आहे.

COMMENTS