मोटारसायकल चोरांचा पोलिसांना पुन्हा झटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकल चोरांचा पोलिसांना पुन्हा झटका

शहरात मोटारसायकल चोरांचा चांगलाच धुडगूस सुरू असून ते चांगलेच निर्ढावल्याचे दिसत आहेत. म्हणूनच की काय ते पोलिसांना झटक्यावर झटके देत आहेत.

एकल समितीच्या कामाचा महिला आयोगाने केला गौरव
बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा येथे कला कार्यशाळा उत्साहात  
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी नितीन खंडागळे


अहमदनगर/प्रतिनिधी-शहरात मोटारसायकल चोरांचा चांगलाच धुडगूस सुरू असून ते चांगलेच निर्ढावल्याचे दिसत आहेत. म्हणूनच की काय ते पोलिसांना झटक्यावर झटके देत आहेत. मोटारसायकल चोरांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून पोलिसाची मोटारसायकल चोरून नेल्यानंतर मंगलगेट पोलिस चौकीसमोर लावलेली मोटारसायकल आता चोरून नेली आहे. ही घटना मंगलगेट येथील मंगळवार बाजारातील मंगलगेट पोलिस चौकी समोर भर बाजाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी घडली आहे.

याबाबतची माहिती अशी की मंगल गेट येथे मंगळवार बाजार भरत असलेल्या ठिकाणी असलेली मंगल गेट पोलिस चौकी ही महिन्यातील बहुतेक दिवस बंद असते, परंतु मंगळवार बाजार दिवशी ही पोलिस चौकी सुरू असते. या दिवशी बाजारात होणारी गर्दी व होणार्‍या चोर्‍यांवर पोलिसांची नजर असते. तसेच काही वेळेस पोलिस आपले पेंडिंग काम (गुन्हे कागदपत्रे तयार करण्याचे) यावेळी या पोलिस चौकीत करीत असतात म्हणूनच बाजारात येणारे नागरिक पोलिसांच्या भरवशावर आपली किमती वाहने या चौकीच्या जवळपास लावतात. मंगळवारी दि. आठ रोजी सकाळी साडेदहा वाजता संजय नानासाहेब गायकवाड (वय 25, राहणार गजराजनगर, औरंगाबाद रोड, नगर) यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची हिरो मोटरसायकल (क्रमांक एमएच सोळा बीए 8576) ही मंगल गेट पोलिस चौकीसमोर लावली व भाजी आणण्यासाठी ते भाजीबाजारामध्ये गेलेले असता चक्क पोलिस चौकी समोरून त्यांची हॅण्डल लॉक केलेली मोटारसायकल अज्ञात चोरांनी लॉक तोडून बनावट चावीच्या सहाय्याने चोरून नेली. गायकवाड यांनी बाजारात त्यांच्या मोटारसायकलचा शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. ती चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तोफखाना पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस नाईक गर्जे करीत आहेत. शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाहन चोरांनी डोके वर काढले असून वाहनचोरीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलिस वाहन चोरीच्या घटना रोखण्यास अयशस्वी होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

COMMENTS