Homeताज्या बातम्या

माजी आ. भीमराव धोंडे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर7 जुलै रोजी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार भीमराव धोंडे यांची प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र

पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; आष्टी तालुक्यातील हृदयद्रावक घटना
आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार
ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस



शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार भीमराव धोंडे यांची प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. नवभारत मीडिया ग्रुपच्या वतीने हा पुरस्कार 7 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील हयात रिजन्सी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपचे सरव्यवस्थापक कल्याण पांडे यांनी निवडपत्राद्वारे दिली आहे.
नवभारत मीडिया ग्रुपने पाठविलेल्या निवडपत्रात नमूद केले आहे की, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव समाजातील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास निवड समितीने व्यक्त केला आहे. यासोबतच धोंडे यांना ‘विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2047’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टावर आधारित या परिषदेत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, विकासाचा रोडमॅप, उद्योग, प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन होणार आहे. या परिषदेला देशभरातील धोरणकर्ते, उद्योगपती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नवभारत मीडिया ग्रुपचे सरव्यवस्थापक कल्याण पांडे तसेच निवड समितीनेही धोंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ची निवड का ठरली विशेष?
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत माजी आमदार भीमराव धोंडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 7 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील हयात रिजन्सी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. ‘विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2047’ या राष्ट्रीय परिषदेत होणार्‍या या गौरवामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे.

COMMENTS