Homeताज्या बातम्या

धनादेश न वटल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेतील धनादेश न वटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत संस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे आणि संचालक यश

इन्फिनिटी बीकॉन फसवणूक प्रकरणात कारवाईची मागणीगुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा ; पोलिस तपासावर नाराजी
शेअर्स फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज मागे  
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं



ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेतील धनादेश न वटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत संस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे आणि संचालक यशवंत कुलकर्णी यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (दि. 30 जून 2026) न्यायाधीश के. के. पाटील यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासाच्या दृष्टीने आरोपींना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी 9 जुलै 2026 रोजी होणार आहे.
या प्रकरणातील फिर्यादी बाबासाहेब लहाणेबापू गव्हाणे (रा. गुंदा वडगाव, ता. जि. बीड) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी शेतीमालाच्या उत्पन्नातून साठवलेली 5 लाख 65 हजार रुपयांची रक्कम ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत मुदतठेवीच्या स्वरूपात ठेवली होती. मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही रक्कम परत मागितली असता, पतसंस्थेकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याऐवजी चेअरमन सुरेश कुटे आणि संचालक यशवंत कुलकर्णी यांनी जनता सहकारी बँक लिमिटेड, सोलापूरच्या बीड शाखेचा 5 लाख 65 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत सादर केल्यानंतर तो न वटता परत आला. त्यानंतर फिर्यादीने वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावून धनादेशाची रक्कम अदा करण्याची मागणी केली. मात्र नोटीसला उत्तर न देता मुदतीत रक्कमही अदा करण्यात आली नाही. त्यामुळे फिर्यादीने न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. या प्रकरणात आरोपींना 15 मे 2026 रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश तुरुंग अधीक्षकांना देण्यात आले होते. त्यानुसार 30 जून रोजी आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत पुढील सुनावणी 9 जुलैपर्यंत तहकूब केली. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. गणेश एम. कोल्हे यांनी बाजू मांडली, तर त्यांना अ‍ॅड. मोनाली कराड यांनी सहकार्य केले. तपासाच्या दृष्टीने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी विधिज्ञांनी न्यायालयासमोर केली होती. ती ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

COMMENTS