Homeताज्या बातम्या

900 कोटींच्या वाळू घोटाळ्याचा ‘खरा सूत्रधार’ मोकाटच?तहसीलदार खोमणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गोदावरी कृती समितीची मागणी; 30 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआंदोलनाचा इशारा

बीड जिल्ह्यात चर्चेत आलेल्या घरकुल वाळू वाटप प्रकरणात कथित 900 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील तत्कालीन तह

चुलत बहिणीवर अत्याचार करणार्‍या नराधमास 10 वर्षे सश्रम कारावास; बीड जिल्हा न्यायालयाचा निकाल
शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!
शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड



बीड जिल्ह्यात चर्चेत आलेल्या घरकुल वाळू वाटप प्रकरणात कथित 900 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील तत्कालीन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ वसुली करावी, या मागणीसाठी गोदावरी बचाव सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कारवाई करून मुख्य जबाबदार अधिकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न महसूल विभागाकडून होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकार्‍यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अपर महसूल आयुक्त रिता मेत्रेवार यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत गेवराई तालुक्यात महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित घटकांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप गोदावरी कृती समितीने केला आहे. या प्रकरणात काही कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कारवाई झाली असली तरी तत्कालीन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा दावा समितीने केला आहे. रक्षसभुवनसह अन्य ठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू आहे. एटीओएस व इंदोटूरे फर्मची माहिती, 10उ वाहनांचे क्रमांक, टेंडरधारकांचे आदेश यासह अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. संबंधित अधिकार्‍यांचे कॉल डिटेल, मोबाईल लोकेशन आणि परमेश्वर सानप यांच्याशी असलेल्या संबंधांची चौकशी का होत नाही? असा सवाल समितीने निवेदनातून उपस्थित केला आहे. तत्कालीन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कथित 900 कोटींची वसुली करावी तसेच संबंधित आरटीओ व पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. या मागण्यांवर 30 जूनपर्यंत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोदावरी बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. 900 कोटींच्या कथित घोटाळ्यानंतरही तहसीलदारांवर गुन्हा का दाखल नाही? वसुली आणि पुढील कारवाईला विलंब होण्यास जबाबदार कोण? वाळू माफियांना संरक्षण देणारी कथित महसूल साखळी कधी उघड होणार? तत्कालीन तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. कथित 900 कोटींची वसुली तातडीने करावी. मंडळ अधिकारी परम काळे यांचे कॉल डिटेल व लोकेशन तपासावे. आरटीओ व संबंधित पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करावी.

COMMENTS