Homeताज्या बातम्या

उद्या कोळवाडे येथे आदिवासी मेळावा

संगमनेर : गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 1 जुलै) कोळव

कोतुळ सहकारी संस्थेतील गैरव्यवहाराच्या वसुलीचे आदेश
तुकाराम मुंढेंच्या भेसळविरोधी मोहिमेस ग्राहक पंचायतीचा पाठिंबा  
अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना


संगमनेर : गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 1 जुलै) कोळवाडे येथे भव्य आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या वतीने जय हिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे या ठिकाणी हा भव्य आदिवासी मेळावा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शबरी माता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या उपाध्यक्ष गिरीजा पिचड, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, महिला प्रदेशाध्यक्ष सुनिता अहिरे, प्रदीप अहिरे, शरद पवार  यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या आदिवासी मेळाव्यासाठी संगमनेर व अकोले तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS