Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

माझी बांधीलकी केवळ संविधानाशीपोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांचा खुलासा

नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबाबत सुर

आ.संजय गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही; शिवसेनेने हात झटकले, विधानाचा केला निषेध
बदनामीचे राजकारण थांबवा : वडेट्टीवारपक्षांतराच्या अफवांना दिला पूर्णविराम
खा. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा


नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबाबत सुरू असलेल्या वादावर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे. भारतीय राज्यघटनेप्रतीच आपली निष्ठा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा ठाम दावा त्यांनी सोमवारी केला.
पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून आपली बांधिलकी केवळ राज्यघटनेतील मूल्यांशी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कायद्याच्या राज्याचा सन्मान राखणे हेच आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमातील उपस्थितीवरून विरोधी पक्ष काँग्रेसने आक्षेप घेतला होता. अखिल भारतीय सेवा आचारसंहितेचा संदर्भ देत, एका वरिष्ठ अधिकार्‍याने विशिष्ट विचारसरणीशी संबंधित मंचावर उपस्थित राहणे योग्य आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. तसेच, अशा कार्यक्रमासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेतली होती का, याबाबतही विचारणा करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर नांगरे पाटील यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देत कोणतीही नियमभंगाची कृती झालेली नसल्याचे सांगितले. पोलीस दलाचे कार्य केवळ गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्यापुरते मर्यादित नसून, गुन्हे रोखणे, जनजागृती करणे आणि समाजात प्रबोधन घडवून आणणे हेही त्याचाच अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे सार्वजनिक कर्तव्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर कार्यक्रम एप्रिल महिन्यात सानपाडा येथे आयोजित करण्यात आला होता. काही मान्यवर नागरिकांनी निमंत्रण दिल्यानंतर कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर रात्री या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आपण तेथे युवकांमध्ये व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये आणि सार्वजनिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS