Homeताज्या बातम्या

दिव्यांगी लांडे हिला सिनिअर राष्ट्रीय ऍथलेटिक्समध्ये ब्राॅन्झ; अहिल्यानगरच्या ‘एक्सप्रेस’ची भुवनेश्वरमध्ये दमदार कामगिरी

अहिल्यानगर: भुवनेश्वर (उडीसा) येथे सुरू असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय सिनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू दिव्यांगी लांडे हिने ४ बाय १०० मीटर

रोटेगाव येथे मनोरा गाडी मार्गिका व निवारा शेडचे लोकार्पण; विद्युत वरील तारेच्या देखभाल व्यवस्थेला नवे बळ
फरार आरोपी २२ वर्षांनंतर जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई, नाव बदलून पोलिसांना देत होता चकवा
नाट्यशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत अभिषेक इनकर व अभिषेक घुले प्रथम; के.एस.के. महाविद्यालयाचे यश

अहिल्यानगर: भुवनेश्वर (उडीसा) येथे सुरू असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय सिनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू दिव्यांगी लांडे हिने ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत ४६.२१ सेंकदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राला ब्राॅन्झ मेडल (कांस्यपदक) मिळवून दिले आहे. महाराष्ट्राच्या रिले संघाने अत्यंत दमदार कामगिरी करत हे यश संपादन केले. या यशस्वी रिले संघामध्ये प्राजंली पाटील, दिव्यांगी लांडे, ऐष्वर्या मिश्रा आणि हरीता बद्रा यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, दिव्यांगी लांडे ही या राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे.

महाराष्ट्राची उत्कृष्ट धावपटू आणि ‘अहिल्यानगरची एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्यांगीने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. यापूर्वी तिने हरियाणा (रोहतक) येथे झालेल्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रिलेमध्ये सुवर्णपदक, पंजाब येथे झालेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत १०० व २०० मीटर प्रकारात ब्राॅन्झ पदक, तसेच बिहार (पटना) येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिल्व्हर मेडल (रौप्यपदक) प्राप्त केले आहे. दिव्यांगीला शारीरिक शिक्षण संचालक डाॅ. विजय म्हस्के, क्रीडा शिक्षक संभाजी ढेरे आणि क्रीडा मार्गदर्शक कोच गणेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, प्रा. शशिकांत गाडे, प्राचार्य डाॅ. प्रविण बडदे, आणि ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव आदी मान्यवरांनी तिचे विशेष अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS