Homeताज्या बातम्या

पिण्याचे अस्वच्छ पाणी हॉटेलमध्ये दिले जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरजहॉटेल, गाड्यावर खाद्यतेलाचा पुनर्वापर

नांदेड शहरातील अनेक हॉटेल व गाड्यावर विक्री करण्यात येणार्‍या खाद्यपदार्थासाठी तेलाचा पुनर्वापर अनेक वेळा करून पदार्थ बनविण्यात येतात, पिण्याच्या

राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचा मंत्री शिरसाट यांचा दावा
अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी! FDA च्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत जप्त केलेला ट्रक पळवला; वाळूज पोलिसांकडून दोन मुख्य आरोपींना अटक



नांदेड शहरातील अनेक हॉटेल व गाड्यावर विक्री करण्यात येणार्‍या खाद्यपदार्थासाठी तेलाचा पुनर्वापर अनेक वेळा करून पदार्थ बनविण्यात येतात, पिण्याच्या पाण्याची शुद्धता नाही, स्वच्छतेचा अभाव आहे, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी अस्वच्छ कपडे वापरतात, अशा अनेक गंभीर बाबी शहरात चालत असून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नांदेड शहरात मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मागील अनेक वर्षापासून भोकर शहरामध्ये दूध पनीर व खव्याची भेसळ करून विक्री केली जाते स्वीट मार्ट मध्ये बनविण्यात येणारे पदार्थ देखील भेसळ खव्यापासून बनवतात. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर भेसळ करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. भोकरमध्ये भेसळ पनीर, दूध, खवा विक्री करणार्‍यांनी आपला कारभार आवरता घेतला आहे. दूध डेअरीवर नांदेड येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली. त्या ठिकाणी भेसळ आढळून आल्याने मोठे गिफ्ट पाकीट घेऊन अधिकारी निघून गेले कार्यवाही मात्र अद्याप कोणावरही करण्यात आलेली नाही. नांदेड शहरातील हॉटेल व गाड्यावर वडापाव भजे विक्री समोसे जिलेबी असे पदार्थ तेलाचा पुनर्वापर करून बनविले जातात तेलाचा पुनर्वापर करणे हे बंधनकारक आहे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने असे आदेश काढले असून तेलाचा पुनर्वापर करता येणार नाही हे मानवी शरीराला धोकादायक आहे भोकर शहरामध्ये अनेक हॉटेलमध्ये ढाब्यावर बार व रेस्टॉरंट यामध्ये असे तेल वापरण्यात येत असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.  शहरातील बहुतांश हॉटेलवर व धाब्यावर पिण्याचे शुद्ध पाणी दिल्या जात नाही फिल्टर पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागते अन्न व प्रशासन विभागाने आदेश जारी केला असून हॉटेलमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर केला पाहिजे तशी पाटी देखील लावली पाहिजे मात्र अनेक हॉटेल व ढाब्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते भेसळयुक्त तेलाचा वापर करून बनवलेले अन्न देखील शुद्ध राहिलेले नाही. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्या जात आहे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नांदेड शहराच्या भेसळ कारभाराविरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांचे आरोग्य वाचविण्याची गरज आहे.

COMMENTS