Homeताज्या बातम्या

देगलूर नाका परिसरात मेडिकल नशेखोरांचा अड्डा?अल्पवयीनांना जाळ्यात ओढण्याचा गंभीर आरोप, प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईची मागणी

नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात वैद्यकीय औषधांचा गैरवापर करून नशा केली जात असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. स

पिण्याचे अस्वच्छ पाणी हॉटेलमध्ये दिले जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरजहॉटेल, गाड्यावर खाद्यतेलाचा पुनर्वापर
चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
भंडाऱ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा करणारी औषधे जप्त



नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात वैद्यकीय औषधांचा गैरवापर करून नशा केली जात असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींकडून नशा आणणार्‍या औषधांची बेकायदेशीर विक्री केली जात असून, त्यात अल्पवयीन मुले व युवक अडकत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुण पिढीचे आरोग्य, शिक्षण आणि भविष्य धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील एका प्राथमिक शाळेजवळ काही संशयित व्यक्तींकडून ट्रामाडॉल (ढीरारवेश्र), डेक्स्ट्रोमेथॉर्फन (ऊदच्) असलेली कफ सिरपे, तसेच काही वेदनाशामक आणि शांत करणार्‍या औषधांचा गैरवापर केला जात असल्याची चर्चा आहे. परिसरातील मोकळ्या जागांमध्ये वापरलेल्या सिरिंज आढळत असल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे. या दाव्यांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास काही औषधांचा नशेसाठी गैरवापर होऊ शकतो. यामध्ये कोडीनयुक्त कफ सिरप, ट्रामाडॉल, प्रेगॅबॅलिन, गॅबापेंटिन, अल्प्राझोलाम, क्लोनाझेपाम, ब्युप्रेनॉर्फिन, टर्मीव्हा, नायट्रोजन -10, कोरेक्स डीएक्स,टर्मीन यांसारख्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणार्‍या औषधांचा समावेश होतो. ही औषधे योग्य वैद्यकीय कारणांशिवाय वापरणे गंभीर आरोग्यधोका निर्माण करू शकते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही अल्पवयीन मुलांना नशेची सवय लावून त्यांना या विळख्यात ओढले जात आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नशेच्या आहारी गेलेल्या युवकांकडून चोरी, मारामारी आणि इतर गुन्हेगारी प्रकार वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काही भागांत गांजा आणि इतर मादक पदार्थांचीही बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. औषध विक्री करणार्‍या मेडिकल स्टोअर्सची तपासणी, संशयास्पद औषध विक्रीवर नियंत्रण, सीसीटीव्ही निरीक्षण आणि शाळांच्या परिसरात विशेष गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी अमली पदार्थ आणि मेडिकल नशाविरोधात कठोर भूमिका घेत व्यापक मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन (एफडीए), पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर औषध विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS