Homeताज्या बातम्या

गौतम खंडागळे ‘अष्टपैलू समाजभूषण’ तर एम.एम.शेख ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित; सा. युवा लोकमित्र सोहळ्यात अभिनंदनाचा वर्षाव

बीड: बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि गेल्या काही वर्षांपासून एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तम नावलौकिक मिळविलेले आष्टी तालुक्यातील शेरी

नाट्यशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत अभिषेक इनकर व अभिषेक घुले प्रथम; के.एस.के. महाविद्यालयाचे यश
उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन; आझाद मैदानावर ढोर-कक्कया समाजाचे शक्तीप्रदर्शन
नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा ’सिंघम’च्या हाती; गुन्हेगारांबरोबरच राजकीय दबावालाही द्यावी लागणार टक्कर!

बीड: बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि गेल्या काही वर्षांपासून एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तम नावलौकिक मिळविलेले आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील मूळ रहिवाशी असलेले गौतम खंडागळे यांना सा. युवा लोकमित्र च्या दिमाखदार सोहळ्यात ‘अष्टपैलू समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर बीड शहरातील प्रसिद्ध गायक एम.एम.शेख यांना ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रित्यर्थ समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

एकीकडे गौतम खंडागळे हे मुंबईत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रशासनिक स्तरावर आपले कर्तव्य चोख बजावत असताना दुसरीकडे त्यांनी आपल्यातील कलावंतही सदैव जागृत ठेवला आहे. गेल्या २० वर्षांपासून कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी ’स्वर साधना आर्केस्ट्रा’ च्या माध्यमातून महाराष्ट्रभर संगीताचे आणि समाजप्रबोधनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. गायक एम. एम. शेख हेही अनेक थोर महापुरुषांच्या साहित्याची पुस्तके विक्री करतानाच आपल्या गायनकलेचा छंद जोपासत अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एक चांगल्या गोड गळ्याचा व उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपास आले आहेत. आता ते संपूर्ण महाराष्ट्रभर गीत-संगीताचे कार्यक्रम करत असून त्यांनी अनेक गायक व गायिकांना एकत्रित करून मोठा संच तयार केला आहे.

सा. युवा लोकमित्र चे संपादक तथा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजक ताहेर शेख यांनी आयोजित केलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या दोघांना सन्मानित करण्यात आले. राज्यमंत्री दर्जा असलेले वक्फ महामंडळाचे चेअरमन समीर काझी, बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे, ज्येष्ठ नेत्या सुशीला ताई मोराळे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व लेखक अल्ताफ शेख, भागवत तावरे, गणेश सावंत, वैभव स्वामी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रित्यर्थ अस्मिता अहिरे, संध्या-आकाश जाधव, कृष्णा पांगरे या गायक-गायिकांसह बीड जिल्हा परिषदेतील अधिकारी पठाण युसूफ़ खान यांनी दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

हा दिमाखदार गौरव सोहळा शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता बार्शी नाका चौक, बार्शी रोड, बीड येथील ताज पॅलेस, कादरपुरा येथे पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

COMMENTS