Homeताज्या बातम्या

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी भाजप बळकट करावा: बेलापूर येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार

बेलापूर: नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे व सहकार्यामुळे बेलापूरमधील अनेक विकासकामांना गती मिळाली असून गावात विकासाचे नवे पर्व सु

संजीवनीचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम
सिद्धेश काळेची थाळी फेक क्रीडा स्पर्धेसाठी निवड
देवळाली प्रवरामध्ये चक्क पाळीव कुत्र्याचा केला दशक्रियाविधी
Daware Prafull (@prafulldaware) • Instagram photos and videos

बेलापूर: नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे व सहकार्यामुळे बेलापूरमधील अनेक विकासकामांना गती मिळाली असून गावात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी पक्ष संघटना अधिक मजबूत करतील, असा विश्वास तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सचिवपदी निलेश हरदास, बेलापूर शहराध्यक्षपदी प्रफुल्ल डावरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच ज्येष्ठ नागरिक कणजीशेठ टाक, युवक नेते अभिषेक खंडागळे, सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश मिळविल्याबद्दल श्रीकांत वैष्णव आणि वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून नवले बोलत होते.

नवले म्हणाले, की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा योजना, घरकुल वसाहत यांसह विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. विकासकामांबाबत जनतेत सकारात्मक वातावरण असून गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता कायम उभी राहील, असेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करत कार्यकर्त्यांना एकत्र आणावे आणि पक्षवाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम भराटे यांनी केले. यावेळी जालिंदर कुऱ्हे, विष्णुपंत डावरे, भास्कर खंडागळे, इस्माईल शेख, संजय भोंडगे, अभिषेक खंडागळे आणि प्रफुल्ल डावरे यांनी मनोगते व्यक्त केली. अभिषेक खंडागळे यांनी निलेश हरदास व प्रफुल्ल डावरे यांना पक्ष संघटनेत संधी दिल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS