Homeताज्या बातम्या

“शिक्षण घेणे कधीही थांबवू नका, कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही” – अ‍ॅड. संजय रुईकर; होरायझन कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत

नांदेड: होरायझन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, विष्णुपुरी (नांदेड) येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हॉटेल सि

जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन
नीट फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका काठिण्यपूर्ण; भौतिकशास्त्रातील प्रश्नांनी विद्यार्थ्यांची कसोटी, कट ऑफ घसरण्याची शक्यता
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ

नांदेड: होरायझन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, विष्णुपुरी (नांदेड) येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हॉटेल सिटी प्राईड येथे भव्य ‘वेलकम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फिजिओथेरपी हे मानवसेवेचे प्रभावी माध्यम

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव ॲड. संजय रुईकर यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची अखंड प्रेरणा दिली. “शिक्षण घेणे कधीही थांबवू नका, कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही,” असे सांगत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. फिजिओथेरपी हे केवळ एक व्यावसायिक क्षेत्र नसून मानवसेवेचे प्रभावी माध्यम आहे. रुग्णांच्या वेदना कमी करून त्यांना पुन्हा स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम बनविण्याचे कार्य फिजिओथेरपिस्ट करत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे समाजसेवेची संधी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयीन जीवनातील शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करत त्यांनी विद्यार्थ्यांना शरीररचना (Anatomy), शरीरक्रिया (Physiology) या विषयांचा सखोल अभ्यास करण्याचा तसेच आधुनिक संशोधन आणि वेळेचे व्यवस्थापन आत्मसात करण्याचा सल्ला दिला.

महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के; स्नेहा गजलवार राज्यात पहिली

यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशाचा गौरव करताना ॲड. रुईकर यांनी माहिती दिली की, यावर्षी बी.पी.टी. (BPT) अंतिम वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्नेहा गजलवार हिने कायनेसो थेरपी विषयात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. “मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर तुम्ही निश्चितच उत्कृष्ट फिजिओथेरपिस्ट बनाल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सीईओ आशिष शिरसाठ, ओम रुईकर, अनुष्का रुईकर, प्राचार्य डॉ. मयुरेश जानकर, डॉ. शिवप्रसाद पवार, डॉ. प्रियंका निंबाळकर, डॉ. प्रतीक्षा शिंदे आणि सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. नव्या विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमामुळे मोठा आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

COMMENTS