Homeताज्या बातम्या

श्री क्षेत्र चाकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा मंगलमय प्रारंभसंत-महंतांच्या उपस्थितीत विधिवत पूजन; हजारो भाविकांची पालखी व ग्रंथ मिरवणुकीत सहभाग

विसाव्या शतकातील महान संत वै. सद्गुरू ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे आयो

कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
‘कृष्णप्रिया’ संस्थेचे बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू



विसाव्या शतकातील महान संत वै. सद्गुरू ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ सोमवार, दि. 22 जून रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला.
तपोनिधी शांतीब्रह्म ह.भ.प. महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सप्ताहाच्या प्रारंभी पहाटे 4 वाजता माऊली दादा यांच्या समाधीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो भाविक भक्तांनी हरिनामाचा गजर करत माऊली दादांच्या पालखीची व ग्रंथाची भव्य मिरवणूक काढली. टाळ-मृदुंग, वीणा, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. परंपरेनुसार साधुसंत व महंतांच्या उपस्थितीत कलश स्थापना, पूजन, दीपप्रज्वलन, टाळ-मृदुंग-वीणा पूजन तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम विधिवत पार पडला. या प्रसंगी विविध भागातून आलेले वारकरी, टाळकरी, माळकरी, विणेकरी, भजनी मंडळे, गायनाचार्य, मृदंगाचार्य व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ह.भ.प. महंत मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे (श्री बंकट स्वामी मठ संस्थान, नेकनूर), वैराग्यमूर्ती ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू, ह.भ.प. गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज (श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी), ह.भ.प. तपोनिधी शांतीब्रह्म महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, ह.भ.प. नारायण महाराज (उत्तरेश्वर पिंपरी), ह.भ.प. विठ्ठल महाराज खाडे (एकनाथ महाराज संस्थान, सासरा), ह.भ.प. मिसाळ महाराज, ह.भ.प. महादेव महाराज भारती (श्री क्षेत्र कपिलधार), ह.भ.प. संपत महाराज गीते (बेलेश्वर संस्थान) आदी संत-महंतांची उपस्थिती लाभली. संत-महंतांच्या सान्निध्यात फुल टाकण्याचा कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला. ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आगामी दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

COMMENTS