वडवणी शहरातील नागरिकांवरील वाढता आर्थिक भार लक्षात घेता वार्षिक मालमत्ता कर आकारणी कमी करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, वडवणी ता

वडवणी शहरातील नागरिकांवरील वाढता आर्थिक भार लक्षात घेता वार्षिक मालमत्ता कर आकारणी कमी करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, वडवणी तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात वडवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेषराव जगताप, उपनगराध्यक्ष बन्सी भाऊ मुंडे तसेच मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सध्या वडवणी नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना वार्षिक मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र या कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढती महागाई, घरगुती खर्च आणि नागरिकांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मालमत्ता करामध्ये सवलत देण्यात यावी तसेच करण्यात आलेल्या कर आकारणीचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र वडवणी तालुका अध्यक्ष शंकर नामदेव झाडे यांनी नागरिकांच्या वतीने ही मागणी मांडली. यावेळी नगराध्यक्ष शेषराव जगताप, उपनगराध्यक्ष बन्सी भाऊ मुंडे व मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारून मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी नगरपंचायत सभापती तथा नगरसेवक नागेश भाऊ डिगे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र वडवणी तालुका अध्यक्ष शंकर झाडे, सहसंघटक नारायण जाधव, अशोक जगताप तसेच नागरिक उपस्थित होते.

COMMENTS