श्रीगोंदा : तालुक्यातील उखलगाव येथील वाळके वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या समस्येची दखल अखेर शिक्षण वि

श्रीगोंदा : तालुक्यातील उखलगाव येथील वाळके वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या समस्येची दखल अखेर शिक्षण विभागाने घेतली असून शाळेत दुसरे शिक्षक म्हणून सोनवणे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शाळेत केवळ एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची बाब पुढे आली होती. या संदर्भात पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे निवेदन देऊन अतिरिक्त शिक्षकाची मागणी केली होती. या प्रश्नावर प्रसारमाध्यमांनीही आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत शिक्षक उपलब्ध करून दिले.
शाळेत आता दुसरे शिक्षक रुजू झाल्याने विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्गनिहाय अध्यापन, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष तसेच शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाचे आभार मानत, शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच “आता सर्व पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत नियमितपणे पाठवावे,” असे आवाहनही करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळेतील शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS