Homeताज्या बातम्या

पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ

पाटोदा येथील बसस्थानकासमोरील गाळा क्र. 2 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘समर्थ दातांचा दवाखाना’ या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा व स

बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक


पाटोदा येथील बसस्थानकासमोरील गाळा क्र. 2 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘समर्थ दातांचा दवाखाना’ या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा व सत्यनारायण महापूजा शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
दवाखान्याचे उद्घाटन पूजनीय महाराज मंडळी, आमदार सुरेश (आण्णा) धस यांचे सुपुत्र जयदत्त (भैय्या) धस तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी डॉ. विजय गर्जे यांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ह.भ.प. राधाताई महाराज (संत मिराबाई संस्थान, महासांगवी), ह.भ.प. सतीश महाराज उरणकर आणि रामकृष्ण रंधवे महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. संतांच्या आशीर्वादामुळे कार्यक्रमास आध्यात्मिक वातावरण लाभले. उद्घाटन सोहळ्यास नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव, नगरसेवक नयूम पठाण, महेंद्र तात्या गर्जे, मधुकर गर्जे, सद्गुरू गर्जे सर, छगन मुळे, आप्पासाहेब राख, विजय जाधव, चांगदेव गीते, नामदेव सानप (सरपंच, महासांगवी), किशोर आडागळे, रोहिदास गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रवींद्र उत्तम गर्जे यांचे सुपुत्र डॉ. विजय गर्जे यांनी सुरू केलेल्या या दवाखान्यात दातांच्या सर्व प्रकारच्या आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाटोदा व परिसरातील नागरिकांना दंतोपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यास नागरिक, व्यापारी, ग्रामस्थ तसेच गर्जे परिवाराचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS