पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात पावसाने थैमान घातले होते या पावसा मध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतीत शेतीच्या मालाला कोंब आले असून शेतकऱ्य
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात पावसाने थैमान घातले होते या पावसा मध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतीत शेतीच्या मालाला कोंब आले असून शेतकऱ्यांनी हा शेती माल बाहेर फेकला आहे आता पंचनामे कशाचे करता सरसकट नुसकान भरपाई द्या अशी मागणी पंचायत समिती सदस्य शिला खेडकर यांनी केली आहे आज पाथर्डी येथे तहसीलदार शाम वाडकर यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे यावेळी किरण खेडकर म्हणाले आठ दिवस झाले आहेत पाऊस पडून प्रशासनाचा एक अधिकारी ज्यावेळी पाऊस पडत असताना पाहणी करायला गेला नाही परंतु वरातीमागून घोडे अशी परिस्थिती झाली आहे याच कारणामुळे काही शेतकरी अनुदान अनुदानापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे द्यायचा असेल तर सरसकट अनुदान द्या असा इशारा किरण खेडकर यांनी दिला आहे नाहीतर जनआंदोलन केले जाईल . यावेळी मालेगावाडीचे सरपंच अजिनाथ दराडे भारजवाडीचे सरपंच उपसरपंच कृष्णा खाडे मिडसांगवी चे उपसरपंच विष्णू थोरात. मुंगूसवाडचे सरपंच प्रविण खेडकर, ढाकणवाडी चे उपसरपंच सुनील ढाकणे सखाराम दादा खेडकर आदी नागरिक उपस्थित होते भगवानगड पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते
COMMENTS