Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय कटूता संपणार का ?

काही दशकांपूर्वी महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण वेगळेच होते. ते भारावलेले मंतरलेले दिवस होते. राजकीय कटूता नव्हती. असली तरी, ती ख

कृषी निर्यातीत वाढ
केजरीवालांच्या अटकेचे टायमिंग !
सत्ता-संघर्षाचे राजकारण

काही दशकांपूर्वी महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण वेगळेच होते. ते भारावलेले मंतरलेले दिवस होते. राजकीय कटूता नव्हती. असली तरी, ती खिलाडूवृत्ती होती. आपल्यात काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्या टीकेला घेतले जायचे. कार्यकर्ते आणि नेत्यांचे ते दिवस होते. कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून वैचारिक शहाणपण घेण्यासाठी पायघडया पसरवत. त्याचप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधकांचे नाते देखील होते. विरोधकांनी सत्ताधार्‍यांचे चुकत असेल तर, ते दाखवून देत आणि सत्ताधारी देखील आपली चूक खुल्या दिल्याने मान्य करत, आणि ती चूक सुधारत असे. मात्र हल्लीच्या काळात आम्ही चुकलो असा म्हणण्याचा प्रघात, सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून बंद झाला आहे. आम्हीच बरोबर असल्याचा सूर आळवला जात आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी दिवसा स्टेजवर एकमेकांवर जहरी टीका करणारे विरोधक आणि सत्ताधारी मात्र रात्री एकत्र भेटत चर्चा करत. सकाळी केलेल्या टीकेचा त्यांच्या चेहर्‍यावर त्याचा मागमूसही नसे. ती राजकारणाची गरज आहे, याची जाण, याचे भान त्यांना होते. मात्र त्यामुळे ते आपल्या मैत्रीत दूरावा येऊ देत नसे. मात्र अलीकडचे राजकारण खूनशी पद्धतीने हाताळले जात आहे. त्याने मला शह दिला, तर मी त्याला प्रतिशह देईन ही राजकारणाची भाषा होतांना दिसून येत आहे. त्यामुळे राजकारणात ज्याला संधी मिळेल तो प्रत्येकाला संपवायला निघायला आहे, आणि याचा नादात तो स्वतः देखील संपतांना दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाने ही कटूता अधोरेखित केली आहे. एकेकाळी शिवसेना अर्थात ठाकरे गटाने ज्या भाजपसोबत 25 वर्ष युती केली, त्या युतीने ठाकरे गटाची 25 वर्ष सडवली असा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कटूता वाढतच नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन देखील देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे एकप्रकारे खूनशी आणि सूडाचे राजकारण सुरू झाले. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर बघायला मिळाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. प्रश्‍न इतक्यावरच सुटला नाही, तर त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरच दावा केला. त्यामुळे ठाकरे गटाचे सर्वस्व हिरावून घेतल्याची भावना पसरतांना दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील 25 वर्षांपासूनची मैत्रीमध्ये मोठी दरार निर्माण झाली. ज्यातून ही मैत्री पुन्हा फुलणार असे संकेत नाहीच. मात्र यात पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी आम्ही वैचारिक विरोधक असलो तरी, आमचे देवेंद्र फडणवीसोबत शत्रुत्व नसल्याचा उल्लेख केला. त्याला देवेंद्र फडझवीस यांनी देखील साद घालत आमच्यात वैचारिक शत्रुत्व असले तरी, व्यक्तीगत शत्रुत्व नसल्याची साद घातली. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपचे मनोमिलन होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

खरं म्हणजे आपण जितके कठोर आणि खूनशी असतो, तितकेच आपण संवेदनशील आणि भावनिक देखील असतो. त्यामुळे एखाद्याचा बदला घेतल्यानंतर एकीकडे आनंद वाटत असतांनाच, दुसरीकडे त्याला संपवल्याची अपराधीपणाची भावना देखील प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असते. राजकारण भावनेवर चालत नसले तरी, त्यातूनच ही राजकीय कटूता संपविण्याचा माहौल तयार होत असतो. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी कटूता संपवण्याची साद घातली असली तरी, ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मात्र शिवसेनेला संपवण्यासोबत कसली राजकीय कटूता मिटवायची असे विधान केले आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय कटूता मिटवण्याचे काहींना वाटत असले तरी, काहींना ही राजकीय कटूता संपूच नये, असेच वाटत आहे. त्यामुळे राजकीय कटूता संपणार की नाही, की ही कटूता आणखीन वाढत जाईल, याचे उत्तर भविष्यातच मिळेल. 

COMMENTS