Homeताज्या बातम्या

‘वृद्धेश्वर’वर आ. राजळे गटाचे वर्चस्व   दोन जागांसाठी लढत होणार ; बिनविरोध करण्यात अपयश  

पाथर्डी : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांच्या निवडणुकीत १७ जागी सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून

झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटीकाम दर्जेदार व्हावे; नागरिकांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी
राहाता शहरात महात्मा फुले यांना अभिवादन
उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील
ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरु* – महाराष्ट्र ७ न्यूज


पाथर्डी : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांच्या निवडणुकीत १७ जागी सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. कासार पिंपळगाव गटात असलेल्या संचालकांच्या दोन जागेसाठी तीन उमेदवार उभे राहिल्याने या दोन जागेसाठी निवडणूक होणार आहे. गेली चार टर्म वृद्धेश्वरची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवणाऱ्या राजळे गटाला या वेळी मात्र ही किमया साधता आली नाही. राजळे यांचे चुलत दीर शिवशंकर राजळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या साठी राजळे गटाने शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले; मात्र ते फोल ठरल्याने आता कासार पिंपळगाव गटात दोन जागेसाठी माजी आ. अप्पासाहेब राजळे,उद्धव वाघ व शिवशंकर राजळे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
कारखान्याचे सेवासोसायटीचे ६७ मतदार वगळता उर्वरित ८७०८ मतदार आता येत्या २६ ता. ला बॅलेट पेपर वर मतदान करणार आहेत. या निवडणुकीत १९ जागेसाठी ४१ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या पैकी २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने १७ संचालक बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव नाईक  यांनी जाहीर केले.
 या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे : सर्वसाधारण मतदारसंघ-सुभाष  ताठे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, रामकिसन काकडे, सुभाष  बुधवंत, यशवंत गवळी, सुरेश आठरे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, सहकारी संस्था मतदारसंघ – राहुल आप्पासाहेब राजळे, अनु.जाती जमाती मतदार संघ – काकासाहेब शिंदे, महिला राखीव मतदारसंघ – सिंधूबाई महादेव जायभाय, मोनिका राजीव राजळे, इतर मागास मतदारसंघ –  बापूसाहेब पाटेकर, विमुक्त जाती मतदारसंघ – संदीप लोखंडे.

COMMENTS