Homeताज्या बातम्या

निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या तयारीचा अधिकाऱ्यांकडून आढावा

बेलापूर  : विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व गटविकासअध

उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील
भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!


बेलापूर  : विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व गटविकासअधिकारी विवेक गुंड यांनी बेलापूर बु. ग्रामपंचायतीस भेट देऊन आढावा घेतला.
त्रिंबकेश्वर येथून निघणारा निवृतीनाथांचा पालखी सोहळा बेलापूर येथील भारतबुवा हिरवे यांनी सुरु केला. त्यामुळे या पालखीचा बेलापूर येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होतो. या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी ह.भ.प.सोपनराव हिरवे कृषी उत्पन्न बाजार समितेचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारी बाबत माहिती दिली. बैठकीस विस्तार अधिकारी विजय चराटे, सुनील माळी, उप-अभियंता गौरव कांबळे,स्थापत्य अभियंता विशाल आळंजकर, ऍड. अरविंद साळवी, महेश कुऱ्हे, डॉ.अश्विनी लिपटे, भानुदास खरात, स्वाती वारुळे, उदमले आदी उपस्थित होते.

COMMENTS