Homeताज्या बातम्या

बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी आंबेडकरवादी युवकांनी आयोजित केलेला बीड ते मंत्रालय, मुंबई ल

भटके विमुक्त समाज जनगणनेतून वंचित राहू नयेसहारा सर्वांगीण विकास संस्थेचे निवेदन ; प्रशासनाला विशेष सूचनांची मागणी
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा-ब्लॅक पँथर



अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी आंबेडकरवादी युवकांनी आयोजित केलेला बीड ते मंत्रालय, मुंबई लाँग मार्च बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील टप्पे पूर्ण करून आता पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या या पायी लाँग मार्चला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, मार्गातील गावोगावी जनजागृती करण्यात येत असून जल्लोषात स्वागत केले जात आहे.
या लाँग मार्चचे बीड जिल्ह्यात पाच तर अहिल्यानगर जिल्ह्यात दोन मुक्काम झाले आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी कार्यकर्ते विविध ठिकाणी सभा, बैठका आणि संवाद कार्यक्रम आयोजित करत आहेत. या आंदोलनाचा समारोप 26 जून रोजी मुंबईतील आझाद मैदान व मंत्रालय परिसरात होणार असून, त्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अहिल्यानगर येथे बोलताना अजय सरवदे यांनी सांगितले की, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नाकडे समाज अपेक्षित गांभीर्याने पाहत नसल्याची खंत आहे. अनेकजण नेतृत्वासाठी पुढे येत असले तरी सामाजिक ऐक्य, भारतीय संविधानाचा होणारा गैरवापर आणि घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन रोखण्यासाठी व्यापक सामाजिक नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यामुळे या लाँग मार्चचे नेतृत्व समाजाने सामूहिकपणे स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिद्धार्थ शिनगारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोन रिव्ह्यू याचिका फेटाळण्यात आल्याने आंबेडकरवादी युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला असून, पुढील आंदोलनाचे नेतृत्व सहभागी समाजबांधवांनीच करावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. दरम्यान, बीड ते मंत्रालय या लाँग मार्चचा पुढील मुक्काम पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे होणार आहे. भीमा कोरेगाव येथे मार्चचे उत्स्फूर्त स्वागत होण्याची शक्यता असून, आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान या मार्चमध्ये शेकडो आंबेडकरी युवक सहभागी झाले आहेत,

COMMENTS