Homeताज्या बातम्या

श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी डॉ. शंकर शिवशेट्टे, तर पर्यवेक्षकपदी प्रा. हनुमंत सोट यांची नियुक्ती

बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या क

किशोरी इंग्लिश स्कूलमध्ये एआय, रोबोटिक्स व भविष्योन्मुख शिक्षणासाठी मायरा अकॅडमीसोबत सामंजस्य करार
शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. डॉ. शंकर शिवशेट्टे यांची, तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी गणित विषयाचे प्रा. हनुमंत सोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दि. १७ जून २०२६ रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षामध्ये नियुक्ती व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव प्रा. सरोज गोपाळराव सोंडगे यांच्या हस्ते दोन्ही नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. सरोज सोंडगे यांनी महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक बदल, जबाबदाऱ्यांचे पुनर्नियोजन आणि प्रभावी प्रशासनावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी नवनियुक्त उपप्राचार्य डॉ. शंकर शिवशेट्टे व पर्यवेक्षक प्रा. हनुमंत सोट यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS