आजच्या काळात प्रत्येकावर कोणते ना कर्ज नक्की असते. कुणावर व्यावसायिक कर्ज, कुणावर वाहन कर्ज, कुणावर गृहकर्ज असो पण कर्ज नसलेला व्यक्ती दुर्मिळच असेल.
आजच्या काळात प्रत्येकावर कोणते ना कर्ज नक्की असते. कुणावर व्यावसायिक कर्ज, कुणावर वाहन कर्ज, कुणावर गृहकर्ज असो पण कर्ज नसलेला व्यक्ती दुर्मिळच असेल. कर्जाचे हफ्ते आणि महागाई यामुळे पैसे वाचवणे हे एक कठीण काम आहे. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याने आपल्या जीवनशैलीमध्ये काही खास बदल करून कर्ज कसे कमी केले याचा खुलासा केला आहे. (3 crore loan repaid in just 17 months, woman says idea)
द सन यूकेच्या अहवालानुसार, अमेरिकेचे शैनन आणि तिचे पती दोघेही त्यांचे कर्ज फेडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्यांनी आपल्या खर्चात मोठी कपात केली. कर्जाची परतफेड करण्यासाठी, जोडप्याने फर्निचरपासून आपल्या जेवणापर्यंत काटकसर करण्यास सुरवात केली.
शैननच्या कुटुंबात पाच लोक आहेत, जे शक्य तितक्या लवकर कर्ज फेडण्यासाठी त्यांचे बजेट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांचे टिकटॉक अकाउंटवर त्याचे व्हिडिओ अपलोड करतात, जे लोकांना खूप आवडतात. सध्या हे जोडपे 4 कोटी 66 लाख रुपयांवरून 1 कोटी 32 लाख रुपयांचे कर्ज आणण्यात यशस्वी झाले आहे. त्याने हे काम अवघ्या 17 महिन्यांत केले आहे.
जीवनशैलीत बदल लागू करण्यासाठी सुमारे सात महिने लागले
जोडप्याने केलेल्या पहिल्या मोठ्या बदलामध्ये, त्यांनी 3000 चौरस फुटांऐवजी 1000 चौरस फुटाचे घर भाड्याने घेतले, ज्यामुळे कुटुंबाची दरमहा एकूण 86,405 रुपयांची बचत झाली. एवढेच नाही तर या कुटुंबाने त्यांच्या ‘नवीन’ कार विकल्या आणि जुन्या कार खरेदी केल्या. यामुळे त्याने एका महिन्यात 57 हजारांहून अधिक बचत केली. तसेच रात्रीच्या जेवणासाठी बाहेर न जाता त्यांनी हजारो रुपयांची बचत केली. अशा प्रकारे जीवनशैलीत बदल लागू करण्यासाठी सुमारे सात महिने लागल्याचा शैननचा दावा आहे.
दोन वर्षांत तीन-चतुर्थांशाने कमी केले कर्ज
अशाप्रकारे केवळ दोन वर्षांत कुटुंबाने तिचे कर्ज तीन-चतुर्थांशाने कमी केले आहे. आता ते त्यांच्या टिप्स इतरांसोबत ऑनलाईन शेअर करतात, जेणेकरून त्यांना कर्ज फेडण्याच्या किंवा बचतीच्या टिप्स मिळू शकतील. शैनन एक चार्ट बनवून तिच्या खर्चाचा तपशील तयार करते, ज्यामध्ये वीज बिल, पाणी बिल, भाज्या, खरेदी ते मोबाईल रिचार्ज यांचा हिशोब असतो.
COMMENTS