Homeताज्या बातम्या

नांदेड येथे स्वतंत्र ‘एफडीए’ प्रयोगशाळा सुरू करा; शहर विकास समितीची जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ व औषधांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. या कारव

महायुती मजबूत, तरी काँग्रेसचा आक्रमक डाव; विधान परिषद निवडणुकीत रंंगणार राजकीय थरार!
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड
गोदावरीच्या पात्रात प्रदूषणाची वाढ; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कायमनाल्यांचे सांडपाणी, निर्माल्य व कपड्यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात
Amarnath - नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त  जीएसटी नांदेड : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल ...

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ व औषधांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. या कारवायांच्या पार्श्वभूमीवर, जप्त केलेल्या नमुन्यांची जलद तपासणी करण्यासाठी नांदेड येथे स्वतंत्र ‘एफडीए’ (FDA) प्रयोगशाळा सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तातडीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा, अशी मागणी शहर विकास समितीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाची नमुने तपासणी प्रयोगशाळा फक्त मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेच कार्यरत आहे. यामुळे नांदेड आणि परिसरातील विभागाला धाड टाकल्यानंतर जप्त केलेल्या मालाचा तपासणी अहवाल (Lab Report) मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. या विलंबाचा फटका अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या गतीला बसत असून संबंधित आस्थापनांनाही अहवालाची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

नांदेड येथे स्वतंत्र तपासणी प्रयोगशाळा निर्माण झाल्यास नांदेडसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनाही याचा मोठा फायदा होईल आणि भेसळखोरांवर तातडीने कायदेशीर बडगा उगारणे शक्य होईल, असे शहर विकास समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ही प्रयोगशाळा तात्काळ मंजूर करावी, अशी मागणी शहर विकास समितीचे उमाकांत जोशी, वसंत सुवर्णकार, डॉ. शिवाल, डॉ. शिवराज केंद्रे, डॉ. हरदीपसिंग, हरेश ठक्कर आणि अमजद बेग यांनी केली आहे.

COMMENTS