Homeताज्या बातम्या

जमिनीच्या मोजणीसह विविध सेवांसाठी नागरिकांना मिळणार दिलासा

नांदेड जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाची ३ नवीन कार्यालये कार्यान्वित नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत भूमी अभिलेख विभागाच्य

विजेच्या लपंडावाने नांदेडकरांना हैराण; महावितरणचा भोंगळ कारभार, नागरिक आंदोलनाच्या तयारीत
नांदेडमध्ये महापौरांच्या वॉर्डातच काळ्या, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; मनपा प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!
किनवटमध्ये खळबळ; अवैध लाकूड तस्करांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, दुचाकी लुटून दिली जिवानीशी मारण्याची धमकी
Home | भूमि अभिलेख - महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग

नांदेड जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाची ३ नवीन कार्यालये कार्यान्वित

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत भूमी अभिलेख विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधाची अंमलबजावणी राज्यभर १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. या निर्णयाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जमिनीच्या मोजणीसह विविध तांत्रिक सेवांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने ११ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा पुनरावलोकन करून विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर केला होता. यामध्ये विभागातील मंजूर पदसंख्या ९ हजार ६८९ वरून वाढवून १० हजार ६८३ करण्यात आली आहे. विभागाची वाढती व्याप्ती आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील कामकाजाचा व्याप आणि नागरिकांची संख्या लक्षात घेता, सुधारित आकृतीबंधानुसार ‘उपसंचालक भूमी अभिलेख (नांदेड प्रदेश)’, ‘जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नांदेड क्र. २ (मुख्यालय भोकर)’ आणि ‘नगर भूमापन अधिकारी (नांदेड)’ ही तीन नवीन कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख (पुणे) यांच्या आदेशानुसार ही कार्यालये कार्यान्वित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर प्रदेशाचे उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सीमा देशमुख यांनी या कार्यालयांच्या कामकाजाचा शुभारंभ केला.

१५ जूनपासून या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले असून, आता नागरिकांना जमिनीच्या मोजणी, नकाशे, अभिलेख विषयक तांत्रिक सेवा आणि इतर महसुली कामांसाठी जिल्हा मुख्यालयावर वारंवार येण्याची गरज भासणार नाही. संबंधित परिसरातच सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे.

COMMENTS