Homeताज्या बातम्या

तुकाराम मुंडे नांदेडला आल्याच्या अफवेने खळबळ; कारवाईच्या भीतीने शहरातील पानटपऱ्या बंद, गुटखा विक्रेत्यांचा पोबारा

नांदेड : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे नांदेड दौऱ्यावर आले असल्याची अफवा मंगळवारी शहरात वेगाने पसरल्यानंतर मुख्य बाजारपेठांसह

शासकीय शाळांसमोर अस्तित्वाचे आव्हान! पहिलीच्या प्रवेशसंख्येत सलग घट; प्रत्येक बालक शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाची व्यापक मोहीम
केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीवर संशयाची छायाहितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप; नातेवाईकांना उमेदवारी, अधिकार्‍यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘नेटवर्किंग’चा नवा उद्योग !डोहाळे जेवणापासून थेट ‘डेस्टिनेशन टूर’पर्यंतचा प्रवास चर्चेत
FDA Tukaram Mundhe Action: तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! गुटखा, पानमसाला  विक्रेत्यांवर कारवाई, ३२ अटकेत

नांदेड : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे नांदेड दौऱ्यावर आले असल्याची अफवा मंगळवारी शहरात वेगाने पसरल्यानंतर मुख्य बाजारपेठांसह अनेक भागांतील पानटपऱ्या आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने अचानक बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारवाईच्या भीतीने अनेक टपरी चालकांनी दुकाने बंद करून तातडीने पळ काढल्याने काही काळ शहरात एकच खळबळ उडाली होती.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात अत्यंत कठोर मोहीम उघडली आहे. त्यांच्या धडक कारवायांमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये आधीपासूनच प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. अशातच, मंगळवारी दुपारच्या सुमारास मुंडे हे नांदेडमध्ये दाखल झाले असून शहरात मोठी तपासणी मोहीम सुरू होणार आहे, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियासह व्यापारी वर्तुळात पसरली.

या अफवेचा परिणाम इतका झाला की वजीराबाद, शिवाजीनगर, गुरुद्वारा परिसर, इतवारा, देगलूर नाका यांसह शहरातील इतर प्रमुख भागांतील पानटपऱ्या अवघ्या काही मिनिटांत बंद झाल्या. गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी दुकानांचे शटर खाली ओढून तातडीने तेथून काढता पाय घेतला. दुपारनंतर अनेक ठिकाणी नियमित सुरू असणाऱ्या टपऱ्या बंद असल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान, तुकाराम मुंडे प्रत्यक्षात नांदेड दौऱ्यावर आले नव्हते, मात्र केवळ त्यांच्या नावाच्या अफवेने निर्माण झालेल्या या परिस्थितीची शहरात दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती.

COMMENTS